ठाणे व मिरभाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रत्येक उद्यानात “एक युवासैनिक एक झाड”
युवासेना सचिव पुर्वेश सरनाईक यांच्या “एक युवासैनिक एक झाड” या संकल्पनेतून ठाणे व मिरभाईंदर महापालिका क्षेत्रातील जवळपास १७० उद्यानात केली वृक्ष लागवड आणि ह्या उद्यानांची निगा व देखभाल करण्याचा केला संकल्प.
आज दिनांक ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव, नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी ठाणे व मिरभाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रत्येक उद्यानात “एक युवासैनिक एक झाड” या संकल्पनेतून आज जवळपास १७० उद्यानात कडुलिंब, ताम्हण, बाहवा, निलगिरी, आवळा अशा विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. यापुढे हे युवासैनिक या उद्यानांची निगा तसेच देखभाल याकडे लक्ष देणार असून ‘वृक्ष जगवणे आणि उद्याने टिकवणे’ हा सर्व युवासैनिकांचा मानस असल्याचे पुर्वेश सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्वतः युवासेना सचिव पुर्वेश सरनाईक, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील युवासेनेचे विधानसभा अधिकारी उमेश अग्रवाल, नितीन लांडगे, सुमित भोईर, विराज म्हामुणकर, सरचिटणीस विराज निकम, निरिक्षक सुशांत मयेकर, समन्वयक अर्जुन डाबी, निखिल बुजबुडे, किरण जाधव तसेच इतर युवासेनेचे पदाधिकारी आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.