ठाणे रेल्वे स्थानकात 2 सरकते जिने लोकार्पण
खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण
(म विजय)
ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकात पश्चिमेस चढताना व उतरताना 2 नवीन सरकता जिन्याचे लोकार्पण सोहळा ठाणे रेल्वे स्थानकात खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी स्टेशन डायरेक्टर सुरेश नायर , स्टेशन मास्तर महीधर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख ,गटनेते नगरसेवक दिलीप बारटक्के , नगरसेविका निशा पाटील ,नम्रता पमनानी , मालती पाटील ,माजी नगरसेवक भास्कर पाटील ,गिरीश राजे , रामभाऊ फडतरे ,विभागप्रमुख प्रकाश पायरे ,राम काळे ,वासुदेव भोईर ,उपविभागप्रमुख अजित देह्रकर ,राजू ढमाले ,गिजे शाखा प्रमुख रमेश शिर्के युवा सेना नेते हेमंत पमनानी व इतर शिवसेना पदधिकारी मोठा संखेने उपस्थित होते .
या पूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात 5 सरकते जिने खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने बसविण्यात आले होते ठाणे पूर्वेस ज्या पध्द्तीने चढताना -उतरताना बसविण्यात आले त्याच पद्धतीने आज पश्चिमेस बसविण्यात आले असल्याने याचा प्रवाश्यांना जास्त फायदा होणार आहे . तसेच ठाणे रेल्वे स्थानकात अपंग व जेष्ठ नागरिकांसाठी 4 लिफ्ट बसविण्यात येत आहे त्याचे ही काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच याचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.