ठाणे येथे खड्ड्यामध्ये बुडून दोन भावंडाचा मृत्यू
ठाणे – शनिवारी सायंकाळी च्या सुमारास खड्ड्यामध्ये बुडून दोन भावंडाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून मृत्युमूखी पडले सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नंदिनी कैलास गुप्ता (८) आणि आनंद कैलास गुप्ता (६) अशी मृत्युमूखी पडलेल्या मुलांची नावे आहेत महापालिकाने एका ठेकेदाराला हे काम दिले असून या प्रकरणामध्ये हलगर्जी झाल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. आर. बागडे यांनी सांगितले.
Please follow and like us: