ठाणे महानगरपालिकेचे २ लाचखोर लिपिकना ३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
बांधकामावर कारवाई न करण्याच्या बदल्यात पाच हजारांची मागणी
ठाणे – घराचे बांधकाम न तोडण्यासाठी वागळे प्रभाग समितीच्या दोन लिपिकांनी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच मागितली होती. बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ३ हजार रुपये घेताना या दोन लाचखोर लिपिकांना अटक करण्यात आली आहे . या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लाचलुचपत खात्याचे युनिट करीत आहे. ३० वर्षीय तक्रारदार हे ठाण्यात वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या परिसरात राहत असून त्यांनी घराचे बांधकाम केले होते. सदर बांधकाम अनधिकृत असून ते तोडण्यात येणार असल्याचे लिपिक किशोर हिरामण झेंडे आणि लिपिक अरविंद चंद्रकांत जैस्वार यांनी सांगितले. बांधकामावर कारवाई न करण्याच्या बदल्यात ३० वर्षीय तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान तीन हजारांच्या बोलीवर बांधकाम न तोडण्याचे निश्चित झाले होते. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत खाते ठाणे युनिटकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून ३ हजाराची लाच घेताना बुधवारी दुपारी ३-१५ वाजण्याच्या सुमारास लिपिक झेंडे आणि जैस्वार याना रंगेहात अटक केली.