ठाणे जिल्ह्याचा लोकशाही दिन ४ जून रोजी
ठाणे – ठाणे जिल्ह्याचा लोकशाही दिन सोमवार ४ जून रोजी दुपारी १ वाजता समिती सभागृह,पहिला मजला,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी लोकशाही दिनासाठी त्यांची तक्रार विहीत नमुन्यात तीन प्रतीत १५ दिवस आधी म्हणजेच १९ मे पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे नोदणी शाखेमध्ये पाठविणे आवश्यक आहे.
लोकशाही दिनी अर्जदार यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असून त्यांची तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असणे आवश्यक आहे. लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्यापूर्वी अर्जदाराने प्रथम संबंधित कार्यलाकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती लोकशाही दिनी सादर कराव्यात.
एका तक्रारी अर्जात एकाच तक्रार असावी,एकापेक्षा अनेक तक्रार असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम तालुका लोकशाही दिना मध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज केला नसल्यास,सदरहू अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये स्वीकारला जाणार नाही. प्रकरण जिल्हाधिकारी कार्यलायाशी संबंधित असल्यास अर्ज भेट स्वीकारण्यात येतील असे जिल्हाधिकारी कार्यालय जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.