ठाणे जिल्हयात पुढचे २४ तास उष्णतेची लाट
नागरिकांनी काळजी घेण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन
ठाणे – ठाणे जिल्हयात पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक वाढ़णार असल्याने जिल्हयाच्या कमाल तापमानातही वाढ़ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास नागरिकांनी तात्काळ ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षासrdmc@thanecity.gov.in या ईमेलवर अथवा दूरध्वनी क्रमांक 022-25371010 किंवा 1800 222 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा अशी सूचनाही महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
उष्म्याच्या लाटेच्या प्रभावापासून बचावासाठी काय करावे किंवा काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत.
हे करू नका :
1. दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नका.
2. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका त्यामुळे डिहायड्रेट होते.
3. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
4. पर्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
हे करा :
1. तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
2. सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
3. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
4. प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
5. आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघडया ठेवा.
6. उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा, डोके, गळा, चेहऐयासाठी ओल्या कपडयाचा वापर करा.
7. अशक्त, कमजोरी असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
8. ओआरएस, घरची लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्या.
9. जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी दया.
10. फॅनचा वापर करा, ठंड पाण्याने आंघोळ करा.