ठाणे कोमसापतर्फे नवोदितांसाठी काव्यलेखन स्पर्धा
(श्रीराम कांदु)
ठाणे : कोमसाप, ठाणे शहर शाखेच्या वतीने काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते३५ या वयोगटासाठी असून, ठाणे, मुंबई, नवी मुंबई विभागासाठी मर्यादित आहे. कवितेला विषयाचे बंधन नाही. स्पर्धा विनामूल्य आहे. परीक्षकांनी निवडलेल्या १५ कवींना रविवार, १० जून रोजी होणा-या निमंत्रित कवींच्या वर्षा कवीसंमेलनात सहभाग घेता येणार आहे. पहिल्या तीन क्रमांकांना मान्यवर कवींच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय, नौपाडा, गोखले रोड, ठाणे (प.) येथे दुपारी सायं ४ ते रात्री ८ या वेळेत होणार असून, कविता पाठवण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. आरती कुलकर्णी (जिल्हा प्रतिनिधी, कोमसाप), १८०१, डेल्फी रहेजा गार्डन, तीन हात नाका, ठाणे (प.) -४००६०४, मोबाईल : ७७३८६५२०४० या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष मेघना साने यांनी केले आहे.