ठाकुर्ली स्थानकावरील रेल्वे पादचारी धोकादायक ….

डोंबिवली दि.२० – कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचे रोजचे उत्पन्न सुमारे तीन लाखांच्या आसपास असून डोंबिवली दिशेला सुमारे ४० ते ५० वर्षापूर्वी पादचारी पुल बांधण्यात आला आहे. या पुलावर एक तिकीट कार्यालय आहे. मात्र हा पूलच आता धोकादायक झाला असून त्यावरील तिकीट कार्यालयही धोकादायक झाले आहे. त्यामुळे ते कार्यालय पूर्वेला रेल्वेच्या दवाखान्याच्या जागेत हलवण्यात यावे अशी मागणी प्रवासी व कर्मचारी करत आहेत.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर एकूण तीन ठिकाणी तिकीट कार्यालय असून रात्री मात्र पश्चिमेला एकच तिकीट कार्यालय सुरु असते मात्र या स्थानकावर पोलीस चौकी नसल्याने तिकीट कारकून जीव मुठीत घेऊन काम करत असतो. ठाकुर्ली स्थानकावर सायंकाळी पाच नंतर इतर कार्यालये बंद होतात व केवळ एकच कार्यालय सुरु असते त्या कार्यालयाजवळ जागा असून पोलीस बंदोबस्त चोविस तास असावा अशी मागणी प्रवासी व कर्मचारी करत आहेत. कारण सायंकाळी पाच नंतर अ-सामाजिक तत्व असणारे लोक मोठया प्रमाणात असतात. त्यांच्यापासून प्रवाशांचे व कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्याची गरज आहे.

तसेच मोठया प्रमाणात रोख रक्कम जमा होत असल्याने त्याच्या रक्षणासाठीही पोलीस चौकीची गरज असल्याचे कर्मचारी सांगतात. म्हसोबा नगर जवळ नवीन तिकीट कार्यालयाचे लोखंडी गेटही नादुरुस्त असून कर्मचाऱ्यांनी आय डब्लयु विभागाला सांगूनही ते काम करत नाही अशी तक्रार कर्मचारी करत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेने पश्चिमेला जाण्यासाठी नवा पूर्व पश्चिम पूल बांधल्याने रेल्वे फाटक आता बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी पूलाचा वापर करण्याची गरज असताना नागरिक रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. त्यामुळे अपघात होतात यासाठी फाटकाजवळ दोन्ही दिशेला भिंत बांधण्याची गरज असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. ठाकुर्ली येथे उत्तुग इमारती होत असून लोकवस्तीही वाढत असताना रेल्वे प्रशासनाने या स्थानकाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email