ठाकुर्ली रेल्वेस्थानकाचे फाटक ४ तारखेपासून बंद करण्याचा निर्णय
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – ठाकुर्ली रेल्वे स्थानकालगत अनेक वर्षापासून फाटकातून दुचाकी , चारचाकी आणि अवजड वाहनाची वाहतूक होत होती. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्थानकाजवळ उड्डाणपूल बनविण्याचा निर्णय घेतला. दोन –तीन वर्षानंतर पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पुलावरून वाहतूक सुरु झाली.रेल्वे प्रशासनाने उद्या ४ तारखेला येथील फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अवजड वाहनांना नवीन पुलावरून जाण्यास पालिकेने बंदी घातल्याने आता या वाहनाच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकालगत डोंबिवलीला जाण्यास मार्ग असल्याने अनेक वाहने या ठिकाणाहून ये- जा करत असतात. तसेच अनेक नागरिक फाटक बंद असूनही रेल्वे रूळ ओलांडण्याचे धाडस करतात. या रेल्वे अपघातात अनेकांनी जीव गमावाले आहेत. तसेच अनेक अवजड वाहनाचा त्रास सहन करावा लागत होता. येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पालिका प्रशासनाने स.वा. जोशी विद्यालयाजवळ उड्डाणपुल बनविण्यास ठरवले. यात रेल्वे प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक झाल्यावर पुलाच्या कामास मुहूर्त मिळाला. मात्र पुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने नागरिक वैतागले होते.पुलाच्या उद्घाटनाची वाट न पाहता नागरिकांनी पुलाचा वापर सुरु केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या सिनिअर सेक्शन इंजिनियर विभागाने दोन दिवसांपूर्वी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील फाटक बंद करण्याचे डोंबिवली रेल्वेप्रबंधकांना लेखी आदेश दिले. त्यानुसार उद्या ४ तारखेला सकाळी साडे- अकरा वाजता येथील फाटक कायमस्वरूपी बंद होणार आहे.
ताज़ी बातमी
उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने ठाकुर्ली रेल्वेस्थानकालगत फाटक सुरु
ठाकुर्ली,दि.४ – रेल्वे प्रशासनाच्या सिनिअर सेक्शन इंजिनियर विभागाने ठाकुर्ली रेल्वे स्थानकालगत असलेले फाटक सोमवारी सकाळपासून बंद करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र नागरिकांना याची माहिती दिली नसल्याने याठीकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. ऐनवेळी याची माहिती दिल्याने वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. मात्र उड्डाणपुलाचे काम अर्धवट असल्याने पालिका विभागाने रेल्वे प्रशासनाला विनंती केल्याने पुन्हा फाटक सुरु करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा
उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने ठाकुर्ली रेल्वेस्थानकालगत फाटक सुरु