ठाकुर्ली उड्डाण पुलामुळे  डोंबिवलीतील वाहतुकीची कोंडी सुटणार

(श्रीराम कांदु)

डोंबिवली- शहरातील पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा एकमेव उड्डाण पूल म्हणून फक्त कोपर उड्डाण पुलाचाच पर्याय होता. वाहनांची वर्दळ आणि शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणखी एका उड्डाण पुलाची गरज होती. या साठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता खा डॉ श्रीकांत शिंदे सतत रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत होते  ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्यासाठी जरी पर्याय म्हणून ठाकुर्ली उड्डाण पुलाची निर्मिती झाली असली तरी शहरातील मुख्य समस्या असणाऱ्या वाहतूक कोंडीची मुक्तता या उड्डाण पुलामुळे होणार आहे 

स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे सुमारे 1929 रोजी ठाकुर्ली पॉवर हाऊस हा ब्रिटीश कालीन विद्युत प्रकल्प अस्तित्वात आला. त्यासाठी येथील भूमिपुत्रांच्या शेकडो एकर जमिनी रेल्वे प्रशासनाने विकासाच्या नावाखाली अगदी कमी किमतीत ताब्यात घेतल्या. आज त्याच जागांची उणीव स्थानिक स्वराज्य संस्थाना त्रासदायक ठरत आहे. कारण विकास करायचा झाला तरी जमिनी कोठून आणणार हा यक्ष प्रश्न सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे.

पूर्वेकडील जोशी हायस्कूल उड्डाणपूल मार्गे जाणारी वाहने एक दिशा मार्ग केला तरी तो रस्ता खूपच अरुंद आहे. जोशी हायस्कूल मार्गे जानकी हॉटेल वरून कल्याण रोड. तर दुसरा पर्याय म्हणजे समांतर ठाकुर्ली रस्ता मार्गे 90 फिट रोड असा असला तरी ठाकुर्ली गावठाण भाग असल्याने अरुंद रस्त्यांमुळे नवीन समस्या होण्याची भीती आहे 

ठाकुर्ली उड्डाण पुलामुळे कोपर उड्डाण पुलावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. कल्याणमधून डोंबिवलीकडे येणारी वाहने यापुढे शिळफाटा मार्गाने न जाता पत्री पूल येथे उजवे वळण घेऊन, कचोरे,कांचनगाव-ठाकुर्ली रस्त्याने डोंबिवलीत आठ ते नऊ मिनिटात येतील. तर काही वाहने ठाकुर्लीतील हनुमान मंदिराकडून नेहरू रस्त्याने, पेंडसेनगरमधून डोंबिवलीत येतील. ठाकुर्ली उड्डाणपूलामुळे पश्चिमकडील 52 चाळीतील रस्त्यांचा वापर होवून पश्चिम विभागातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email