‘ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड तात्काळ बदला’असे ट्विटरकडून आवाहन

मुंबई – तुम्ही जर ट्विटर वापरत असाल तर त्वरित तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड बदला. सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

आत्तापर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा मिस युज झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून यूजर्सनी ट्विटरचा स्टोअर्ड पासवर्ड बदलावा असं सांगण्यात आलंले आहे.तर ट्विटरने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर यासंबंधीचं ट्वीट ही केलेल आहे.

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर ३३ दशलक्ष युजर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटच्या सुरक्षेच्या दृष्टीने ट्विटरने हा निर्णय घेतला आहे.दोनच दिवसांपूर्वी ट्विटरने केंब्रिज अॅनालिटिकाला डेटा विकल्याचं वृत्त ब्रिटनमधील वृत्तपत्र ‘द संडे टेलिग्राफ’ने दिलं होतं.आधीच सोशल मीडियावर केंब्रिज अॅनालेटिका कंपनीने डाटा चोरल्याच्या प्रकरणावरून ग्राहकांमध्ये भीती आणि नाराजी आहे. त्यामुळे आता असं काही होण्यापूर्वी तुम्ही तात्काळ तुमच्या ट्विटरचा पासवर्ड बदलून घ्यावा.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email