ट्रापोलिगं जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्टिक्स संघाने पटकाविली दोन पदके
डोंबिवली- मनिला एशियन फिलीपीन्स येथे पार पडलेल्या ट्रापोलिगं जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्टिक्स संघाने दोन पदके पटकावली. या स्पर्धेत खेळाडू शिवानी दऊडं यांनी सुवर्णपदक तर सिद्धी ब्रिरीद हिने सिल्व्हर पदक मिळविल्याने शिक्षक प्रा. रणजीत पवार, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कोषाध्यक्ष तथाआंतरराष्ट्रीरय पंच पवण भोईर यांनी त्यांचे अभिनंदन केले. याचे श्रेय महराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष् संजय शेटे, जिम्नॅस्टिक्स फेडेरेशन ऑफ इंडियाचे सदस्य दिपक काबरा, प्रविण ढगे, सचीव डॉ. मकरंद जोशी यांना विजेत्या खेळाडूंनी दिले. जिम्नॅस्टिक्स फेडेरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेड सुधाकर शेट्टी आणि रणजीत वसावा याचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही एशीयन स्पर्धेत पदक विजेता होऊ शकलो असेहि त्यांनी सांगितले.