ट्रक व लक्झरीच्या अपघातात दोन ठार
जामखेड – हैदराबाद येथील साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचा शुक्रवारी दि.१ रोजी पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला.खर्डा रोडवरील शिरूर फाटा येथे ट्रक आणि लक्झरी यांच्यात हा अपघात झाला.या अपघातामध्ये दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Please follow and like us: