टॉर्चने मारल्याने चिमुरड्याच्या डोक्याला तीन टाके पडले,बालकाच्या कुटुंबीयांचा आरोप

मुंबई – विक्रोळी येथे राहणाऱ्या मुकेशकुमार गुप्ता यांच्या ६ वर्षीय मुलाला अर्धांगवायूचा त्रास होत असल्यामुळे त्याला मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला दाखल केल्यानंतर डोळे तपासताना डॉ. गौरव मौर्या यानी रात्री बारा वाजल्यानंतर डोळे तपासण्यासाठी बोलवल्याचा राग काढत त्या चिमुरड्याच्या डोक्याला टॉर्चने मारल्याने त्याच्या डोक्याला तीन टाके पडल्याचा आरोप गुप्ता कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात चौकशी सुरु असून रुग्णालय प्रशासनानं कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे तर या घटनेची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांना घटनेचं सीसीटीव्ही फूटेज मिळू शकलेलं नाही. तिथला कॅमेरा बंद असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. एम.आर.ए मार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email