टेम्पो चालकासह साथीदाराने केली लोखंडी रॉडने बेदम मारहाण

कल्याण :टेम्पो रॉंंग साईड ने चालवत अंगावर घातल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या इसमाला टेम्पो चालकासह त्याच्या साथीदारने  बेदम मारहाण केल्याची घटन कल्याण पूर्व विठ्ठलवाडी परिसरात घडली आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात टेम्पो चालक प्रमोद दुसारे व चेतन दुसारे विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
उल्हासनगर येथे राहणारे हरेश खेत्रे हे काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपला मित्र मलंग शेख याच्या सोबत दुचाकीने  श्रीराम चौकातून अपर्णा डेयरीच्या दिशेने येत असताना  समोरून एक टेम्पो रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आला.टेम्पो चालकाने कोणताही सिग्नल न देता खेत्रे यांच्या दुचाकी समोर अचानक टर्न मारला .त्यामुळे खेत्रे यांचा तोल गेला त्यांनी या टेम्पो चालक चेतन दुसारे याने टेम्पो अंगावर घालतो का असा जाब विचारला त्यामुळे संतापलेल्या टेम्पो चालकाने शिवीगाळ करत  टेम्पो सुरू करत खेत्रे याना फरफटत नेले व याच दरम्यान प्रमोद दुसारे याने खेत्रे याना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली .या हल्ल्यात खेत्रे जखमी झाले असून त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी टेम्पो चालक प्रमोद दुसारे व चेतन दुसारे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email