ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे निधन झाले.. आपल्या मुंबईतील राहत्या घरी अरुण दाते यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.
आज दुपारी दोन वाजता मुंबईतील सायन स्मशानभूमीत त्यांच अंतिमसंस्कार होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. मराठी भावसंगीताचा शुक्रतारा निखळल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त होत आहे. सध्या ते त्यांचा मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते. दोन वर्षापूर्वी त्यांचा मुलगा संगीत दाते यांचं निधन झालं होतं. ४ मे रोजी अरुण दाते यांचा ८४ वा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यांची तब्येत ठिक नसल्याने ते तिथे उपस्थित राहू शकले नव्हते.
आयुष्यातील प्रत्येक मैफल त्यांनी शुक्रतारा या गाण्याने गाजवली होती. अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. १९६२ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली होती. अरूण दाते गेल्यानंतर त्यांच्या गाण्यांची आठवण प्रत्येक चाहत्यामध्ये आहे. अरूण दाते यांची तशी अनेक गाणी गाजली आहेत, पण अरूण दाते यांच्या निधनानंतर त्यांचं, असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे गीत सर्वांच्या मनात रूंजून घातंल आहे.