ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन

पुणे – ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज शुक्रवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांनी मराठी रंगभूमीवर मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने अवघ्या कलाक्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर उद्या पुण्यात अंतिमसंस्कार होणार आहेत.त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचा मुलगा अन्वय हा अमेरिकेहून निघाला आहे. तो आल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

कोल्हटकरांनी यांनी मराठी रंगभूमीसाठी मोलाचे योगदान दिलं.विजया मेहता यांच्या नाटकांचंही नेपथ्य आणि प्रकाश योजना केली होती.`शेजारी शेजारी’ हा अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर यांचा चित्रपट कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केला होता. ‘आई रिटायर होते’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘सोनचाफा’, ‘दीपस्तंभ’, ‘छावा’, ‘आसू आणि हसू’, ‘गोड गुलाबी’,अशा नाटकांनी त्यांनी नाटकक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. पण त्यांच्या या जाण्यांने अवघ्या नाटक क्षेत्राने मोठा कलावंत गमल्याची खंत व्यक्त होत आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email