ज्येष्ठत्व साजरा करणारा ‘डोंबिवली ज्येष्ठ महोत्सव’

यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड, सिनेनाट्य अभिनेत्री वर्षा दांदळे, मानसोपचार तज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये, कोकण प्रादेशिक विभाग, फेस्कॉमचे अध्यक्ष रमेश पारखे, डोंबिवली ज्येष्ठ नागरिक संघ, अध्यक्ष समन्वय समिती मीराताई कुलकर्णी, इंडस हेल्थ रिसर्च लॅब, संचालिका तनुजा चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांचे सुसंवाद होणार असून, कृतार्थ जीवन, सेवा रत्न, ज्येष्ठ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
निवेदन सौरभ सोहोनी करणार आहेत. कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर, समन्वयक सुबोध पटवर्धन, रेवती अत्रे-घरत आहेत. ज्येष्ठ महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्यास क्रिएशनचे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले.
Please follow and like us: