ज्यांच्या रक्तात कमळ आणि भाजपा, त्यांचेच कुटुंब फोडण्याचे काम शिवसेनेने केले -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधीही पाठीत वार केला नाही
(म.विजय)
पालघर – ज्यांच्या रक्तात कमळ आणि भाजपा, त्यांचेच कुटुंब फोडण्याचे काम शिवसेनेने केले. स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधीही पाठीत वार केला नाही.असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हार येथे एका जाहीर सभेत केलं.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हार येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.पालघर येथील मतदारांना ‘तुम्ही प्रत्येकवेळी कमळाच्या पाठिशी उभे राहिलात, स्व. वणगांच्या पाठिशी उभे राहिलात, मोदीजींच्या पाठिशी उभे राहिलात, मला खात्री आहे, तुमचे आशिर्वाद भाजपालाच मिळतील’. हे सरकार जव्हारच्या पाठिशी आहे असं अवाहनही त्यांनी केले.केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, विष्णू सावरा, उमेदवार राजेंद्र गावित तसेच खासदार आणि आमदार यांचीही यावेळी मोठी उपस्थिती होती.
या सभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
– ज्यांच्या रक्तात कमळ आणि भाजपा, त्यांचेच कुटुंब फोडण्याचे काम शिवसेनेने केले. स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधीही पाठीत वार केला नाही.
– अश्रूंचे राजकीय भांडवल करायचे नसते. ही जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही. अश्रू पुसायचेच होते, तर तुम्हाला 3 मेची का वाट पहावी लागली?
– 2019 च्या डिसेंबरपर्यंत पात्र सर्व आदिवासींना मालकी हक्काचे पट्टे दिले जातील. फळबागांच्या लागवडीसाठी विविध योजनेत निधीही देऊ. त्यांची रोजगारासाठी भ्रमंती थांबवू.
– पिण्याचे पाणी, शेतासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आधीपासूनच काम हाती घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून समृद्धी आणि विकास साधला जातो आहे, येथील प्रत्येक गावाला पाणी मिळेल, यासाठीचा आराखडा तयार होतो आहे.
– गरिब, आदिवासी यांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले. जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले आहे. 12 लाख बेघरांपैकी 4 लाख बेघरांना घर देण्यात आले आहे. 2019 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघराला घर.
– 67 वर्षांत 55 लाख आणि गेल्या 3 वर्षांत 60 लाख शौचालये महाराष्ट्रात बांधण्यात आली. उज्वला योजनेच्या माध्यमातून गरिबांना घरगुती गॅस जोडण्या देण्यात आल्या. पालघरमध्ये 22 हजार गॅस जोडण्या देण्यात आल्या.
– आदिवासी समाजातील कुपोषण कमी करण्यात गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदा यश आले, याचे समाधान आहे. पण, शेवटच्या प्रत्येकाला जोवर मदत मिळत नाही, तोवर आनंद साजरा करणार नाही.
– जव्हारमध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था कायम केल्या जातील. तेथे ज्या काय व्यवस्था लागतील, त्या निर्माण करण्यात येतील.
– तुम्ही प्रत्येकवेळी कमळाच्या पाठिशी उभे राहिलात, स्व. वणगांच्या पाठिशी उभे राहिलात, मोदीजींच्या पाठिशी उभे राहिलात, मला खात्री आहे, तुमचे आशिर्वाद भाजपालाच मिळतील. हे सरकार जव्हारच्या पाठिशी आहे.