जे. के. पाटील इंग्लिश मिडीयम शाळा ही संस्कारक्षम शाळेची पंढरी ;महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे 

(श्रीराम कांदु)
 डोंबिवली – शेतकरी ज्यापद्धतीने शेतीची मशागत करतो त्याप्रमाणे शाळेमध्ये विध्यार्थ्यावर संस्कार करण्याचे काम महत्वाचे कार्य शाळेतील शिक्षक करत असतात. ज्या वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते. त्या वयात शाळेत विद्यार्थ्यांवर परिपूर्ण संस्कार शिक्षकवृंद करत असतो. त्यामुळे भारताची एका भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य जे. के. पाटील इंग्लिश मिडीयम शाळेतून घडत आहे. कोणतीही देणगी न घेता भोपर सारख्या ग्रामीण भागात इंग्लिश माध्यमाची शाळा सुरु करणे अवघड आहे. मात्र आज ते शकत होत असताना दिसते. त्यामुळे जे. के. पाटील इंग्लिश मिडीयम शाळा ही संस्कारक्षम शाळेची पंढरी म्हणावी लागेल, असे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भोपर येथील जे. के. पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी  सांगितले.
      डोंबिवली जवळील भोपर गावात प्रसिद्ध असलेल्या जे. के. इंग्लिश मिडीयम शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थाचालक गजानन पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुळा पाटील, सर्वेश विद्यालयाचे ट्रस्टी महेंद्र पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, युवा मोर्च्याचे गजानन पाटील ( काटई ), माजी सरपंच काळूबुवा मडवी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत विविध खेळ , नृत्य , गाणी यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत विजयी  विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, लहान मुलांना आई- वडिलानंतर संस्कारचे धडे देतो तो शिक्षक असतो. शाळेत विद्यार्थी जे शिकतो ते आत्मसात करतो. हे संस्कार विद्यार्थ्यांना भविष्यात मोठे होण्याचे काम करते. महेंद्र पाटील म्हणाले, या शाळेला खूप महत्व आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर नियोजन पद्धतीने संस्कार केले जातात. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार रूजविण्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास देखील वाढविला जातो.  त्यानंतर तालुकाप्रमुख एकनाथ पाटील म्हणाले, या शाळेचे संस्थापक गजाजन पाटील यांचे कौतुक करावे लागेल, कारण कुठलेही अनुदान किंवा पालकांकडून डोनेशन न घेता आज या शाळेत ४५० विद्यार्थी शिकतात. या शाळेला १० वर्ष पूर्ण होत असून सुरुवातीला दोन वर्गात १० ते १२ विद्यार्थी शिकत होते. आज या शाळेची मोठी इमारत आहे.इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढावी म्हणून मी खूप प्रयत्न करत आहे. सरकारने यासाठी लक्ष दिले पाहिजे. यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य , गाणी सादर केली. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गावकर्यांनी गर्दी केली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email