जुळल्या सुरेल तारा या कार्यक्रमाचा शुभारंभ
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – संगीत क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जुळल्या सुरेल तारा या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार दि २७ मे २०१८ रोजी रात्री ठीक ८.३० वाजता डोंबिवलीच्या सावित्रिबाई फुले नाट्यगृहात मधुमालती एन्टरप्रायझेस तर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत मराठी संगीत क्षेत्रातील गुणवान तंतुवाद्य कलाकार गिटार, सतार , व्हॉयलिन , मेंडोलिन यांच्या वापरातून अजरामर झालेली मराठी व हिंदी गाणी सादर करणार आहेत.
आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या मधुमालती एन्टरप्रायझेस या संस्थेमार्फत आगळेवेगळे कार्यक्रम रसिक डोंबिवली कल्याणकराना संपूर्ण कुटुंबासह पाहता येतील एवढ्या माफक तिकीट दरात आयोजण्याचा आणि झालेला फायदा शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना त्यांच्या उपक्रमांना मदत करण्यासाठी उपयोगात आणणार असल्याचे संस्थेचे संदीप वैद्य यांनी सांगितले.
Please follow and like us: