जुन्या भांडणाचा राग मनात धरून स्टंप ने मारहाण
कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील शांती नगर तुकाराम पाटील चाळीत राहणारे किरण जाधव या रिक्षा चालकाचे दोन महिन्यापूर्वी निखील यादव व सनी यादव या दोघा सोबत काही कारणावरून वाद झाला होता .या वादाचा राग मनात धरून निखील आणि सनी ने त्यांना काळ सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास जैन मंदिरासमोर गाठले .त्यांची रिक्षा थांबवून स्टंप ने जाधव यांना बेदम मारहाण करत तेथून पळ काढला या प्रकरणी जाधव यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसानि निखील यादव व सनी यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: