जुन्या भांडणाचा राग मनात धरून लाकडी दांडक्याने मारहाण

(श्रीराम कंदु)

डोंबिवली दि.०६ – कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली येथील साई कृपा चाळीत राहणाऱ्या कृष्णाबाई चौहान यांच्या मुलगा गोविंदा याचे याच परिसरात राहणाऱ्या अनुप भालेराव, किशोर भालेराव व त्याच्या पत्नी सोबत वाद झाला होता याच वादाचा राग मनात धरून काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनुप भालेराव, किशोर भालेराव व त्याच्या पत्नी चौहान यांच्या घरात घुसले व त्यांनी गोविंद ला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या कृष्णाबाई व त्यांचा मुलगा गोपाळ यांना हि धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात अनुप भालेराव, किशोर भालेराव व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email