जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीने रिक्षा पळूवून नेली
कल्याण – गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये रिक्षा चोरीच्या बऱ्याचशा घटना घडल्या आहेत. अशाच एका रिक्षा चालकाची रिक्षा चोरीला गेल्याची घटना पुर्वेतील खडेगोळवली परिसरात घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली असून गणेश दळवी हा रिक्षा उभी करून आंबे खरेदीसाठी गेला होता मात्र तो रिक्षाची चावी काढण्यास विसरला.याचा फायदा उचलत जुजबी ओळख असलेल्या दिपक डोंगरे याने रीक्षा पळवून नेली. या प्रकरणी गणेश दळवी यांने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी दिपक डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: