जीएसटी घेत असल्याचा समज झाल्याने पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थी नाराज,महाविद्यालयाने काढली समजूत
(श्रीराम कांदु)
डोंबिवली -दि.१३ ( प्रतिनिधी ) येथील के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयातील बारावी उर्त्तीण झालेले विद्यार्थी बुधवारी महाविद्यालयात रिझट घेण्यासाठी गेले असता जीसटी भरण्यास सांगण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र महाविद्यालय व्यवस्थापन विद्यार्थ्याकडून जीएसटी घेत नसून स्टेशनरीची थकबाकी असलेली फी घेत असल्याचे सांगितले.मात्र काही वेळ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये गोंंधळ उडाला होता.
स्टेशनरीची थकबाकी असलेली फी घेण्यासाठी महाविद्यालयातील व्यवस्थापनाकडून चुकून `जीसटी`हा शब्द छापला गेला. महाविद्यालयात रिझट घेण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून जीसटी घेतली जात आहे असे काही विद्यार्थी म्हणत होते. परंतु काही विद्यार्थी रिझट लवकरात लवकर मिळण्यासाठी पैसे भरत होते. तर काही विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयातील व्यवस्थापनाशी याबाबत विचारले असता जीसटी घेत असल्याचा समज झाल्याने पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थी नाराज झाले आहेत. वास्तविक जीसटी घेत नसून स्टेशनरीची थकबाकी असलेली फी घेत जात आहे. काही वेळाने चुकीची दुरुस्ती केल्याने वातावरण शांत झाले.