जिल्ह्यातील जिल्हयातील धसई, दाभाड आणि दिवांजूर आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पुरस्कार

आरोग्य क्षेत्रातील एनक्युएएस पुरस्कारावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची मोहर

ठाणे- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकनात (एनक्युएएस) ठाणे जिल्ह्याने बाजी मारली असून जिल्हयातील धसई, दाभाड आणि दिवांजूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.    

जिल्ह्याच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. सोनवणे ,तसेच तालुका अधिकारी डॉ.तरुलता धानके, डॉ.श्रीधर बनसोडे , डॉ.पांडुरंग चौरे, डॉ.योगेश पाटील,डॉ.प्रशांत खरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयाच्या पीजीआयएमईआर सभागृहात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ता’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी  आरोग्य विभागाच्या टीमचे अभिनंदन केले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दाभाड आणि दिवेअंजूर तर, मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रांनी राष्ट्रीय गुणवत्ताएनक्युएएस  पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मागील वर्षी सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरून एक पथक या प्राथमिक आरोग्य केंद्रांची पहाणी करण्यासाठी आले होते. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांना देण्यात येणार्‍या सेवा, रुग्णालयातील सुविधा, तसेच रुग्णालयातील शिपाई ते वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाची पध्दती यांची प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.