जिल्हा युवा क्रीडा पुरस्कारा करीता प्रस्ताव पटविण्याचे क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन
ठाणे- क्रीडा व युवा सेवा संचालनालय,व महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे व्दारा जिल्हा युवा पुरस्काराकरीता जिल्ह्यातील विविध सामजिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या तसेच सामजिक प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाकडून सदर पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.पुरस्काराकरिता शासन निर्णयात नमुद पात्र अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी विहीत नमुन्यामध्ये आपले अर्ज दि.३० मे २०१८ पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी,ठाणे येथे कार्यालयीन वेळेत व कामकाजाचे दिवशी सदर कारावेत.
अधिक माहितीसाठी ०२२-२५३६८७५५ या वर तसेच thanedso55@gmail.com संपर्क साधावा पुरस्कारासाठी करावयाचा विहीत नामुन्यातील अर्ज कार्यालयातून प्रप्त करून घ्यावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी,ठाणे श्रीमती प्रमोदिनी अमृतवाड यांनी कळवली आहे.