जिल्हा परिषदेच्या विद्यार्थीनीनी घेतला पॅडमॅन चित्रपटाचा आनंद
ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने जि.प. शाळेच्या इयत्ता आठवी ते दहावी वर्गातील विद्यार्थीनीनी नुकताच पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात आला. कल्याण , मुरबाड , अंबरनाथ , शहापूर , भिवंडी आदि पाच तालुक्यातील तब्बल ११२० विद्यार्थीनीनी हा चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला.
राज्य शासनाने ग्रामीण महिलांसाठी तसेच जिल्हा परिषदेच्या किशोर वयीन मुलींसाठी माफक दरामध्ये सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करून देण्याची अस्मिता योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी तातडीने स्वच्छ भारत मिशन – ग्रामीण माहिती , शिक्षण व संवाद अंतर्गत निधीची उपलब्धता करून शिक्षणविभागाच्या मदतीने मुलींना चित्रपट दाखवण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.
यामध्ये अंबरनाथ १६० , भिवंडी ४४८ , कल्याण ११७ , मुरबाड १५५ , शहापूर २४० असा प्रकारे पाच तालुक्याच्या मुलीनी चित्रपट पाहिला. हा चित्रपट कल्याण आणि भिवंडी या दोन तालूक्यातील चित्रपटगृहात ७९ महिला शिक्षकांसमवेत दाखवण्यात आला. सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी यांनी समन्वयाची भूमिका पार पाडली.