जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न;लेझीम खेळाने जिंकली उपस्थितांची मन

ठाणे – ठाणे जिल्हा परिषद शिक्षण (प्राथमिक) विभागाच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा शनिवारी ऑल सेन्ट स्कूल भिवंडी येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. जि.प.अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार , पं.स. भिवंडी सभापती रविना जाधव , उपसभापती वृषाली विशे , मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते. 

यावेळी अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी शालेय जीवनात क्रीडा स्पर्धाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे नमूद केले. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमतांचाही विकास व्हायला हवा म्हणून शालेय क्रीडा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे सांगत जिल्हास्तरा प्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षापासून केंद्रस्तरावर होणाऱ्या स्पर्धांकरिता देखिल भरीव निधीची तरतुद करण्यात येईल असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळाची उपयुक्तता स्पष्ट करत केवळ शालेय जीवना पर्यंत खेळ मर्यादित ठेवू नका तर एखाद्या खेळात पारंगत व्हा असा सल्ला शालेय खेळाडूंना दिला. 

या स्पर्धेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. यामध्ये कब्बडी , खो-खो , लांब उडी , उंची उडी  , लंगडी , धावणे, रिले आदि सांघिक तसेच वयैक्तिक खेळाचा समावेश होता. तर नव्याने समावेश करण्यात आलेल्या लेझीम आणि संगीत खुर्ची खेळांच्या स्पर्धाही यावेळी पार पडल्या. मुलांच्या व मुलींच्या खो-खो स्पर्धेत जि.प.अजनूप शाळेने बाजी मारली तर अनुक्रमे जि.प.कुहे आणि पिंपझे शाळेने उपविजेतेपद प्राप्त केले. तर मुलांच्या कबड्डी स्पर्धेत जि.प. म्हसकळ व मुलींच्या जि.प.सोनाळे शाळेनी बाजी मारली. तर अनुक्रमे जि.प. पूर्णा आणि जि.प. धसई शाळेने उपविजेतेपद मिळवले. 

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या लेझीम स्पर्धेने उपस्थितांची मने जिंकली.. मैदानी खेळांचे महत्व सांगत सिमेंटी जंगलात मैदान देखिल हद्दपार झाली आहेत. त्यामुळे खेळ बहरण्यासाठी मैदाने तयार व्हायला हवीत असा आशयाचा संदेश देणारी लेझीम प्रात्यक्षिक यावेळी पाहायला मिळालीत. या स्पर्धेकरिता साधारण ४० संघ आणि ८५० विद्यार्थी-शिक्षक सहभागी झाले होते. 

या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी कृषी समिती सभापती उज्वला गुळवी , महिला बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे ,जि.प सदस्य ऋता केणे , भिवंडी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव , एकनाथ पाटील , शाम गायखे , यावेळी आवर्जून उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना यादव , ऑल सेन्ट स्कूल उपप्राचार्या , लोनाड सरपंच भगवान केणे , भिवंडी गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के , भिवंडी गट शिक्षण अधिकारी माधव पाटील , शहापूर गट शिक्षण अधिकारी आशिष झुंझारराव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र तरे आणि विद्या शिर्के यांनी केले. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email