जिल्हाधिकारी बातम्या

जिल्ह्यातील बँकांची ८३ टक्के खाती आधारशी जोडली

डिजिटल पेमेंटसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली

ठाणे दि १९: डिजिटल इंडियाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील बँकांनी देखील पाउले टाकली असून बँक खात्यांना आधारशी जोडण्याचे काम झपाट्याने सुरु आहे अशी माहिती लीड बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक अनिल सावंत यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अध्य्क्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली.

राष्ट्रीयीकृत बँकांची ठाणे जिल्ह्यात १३ लाख ५७ हजार ४८६ खाती आहेत. यापैकी ११ लाख ३४ हजार ६३५ म्हणजे ८३ टक्के खाती आधारशी जोडली गेली आहेत. ९ लाख ४४ हजार ७४३ म्हणजे ७० टक्के रूपे कार्ड्स खातेदारांना देण्यात आले आहेत. ३ लाख ३२ हजार ७५९ खाती झिरो बेलेन्सची आहेत.

रूपे कार्ड हे नैशनल पेमेंट कॉर्पोरेशनने तयार केलेली प्लास्टिक कार्ड असून या कार्डामार्फत केलेल्या व्यवहारांवर अतिशय कमी शुल्क लागते. तसेच सर्व प्रकारच्या इलेक्ट्रोनिक व्यवहारांसाठी वापरण्यास अतिशय सोपे आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करावा म्हणून प्रादेशिक परिवहन विभागमहावितरण,सर्व तहसील कार्यालयेशिधावाटप यंत्रणा तसेच इतर शासकीय कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बँकांना सुद्धा त्यांची बचत खाती मोबाईल तसेच आधारशी संलग्न करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच लोकांमध्ये देखील जागृती व्हाव्ही यासाठी काही अभिनव उपक्रम येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणार आहेत. विशेषत: विद्यार्थीरिक्षा संघटना छोटे व्यापारी यांची मदत घेण्यात येणार आहे.

——————-

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेत

क्षत्रिय, गांधी विजयी

ठाणे दि १९: अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित पोस्टर ( भित्तीपत्र) स्पर्धेत श्रुतिका क्षत्रिय आणि सलोनी गांधी या विजयी झाल्या आहेत.

वरिष्ठ गटात चिन्मय जोशी, प्राची दिघे यांना अनुक्रमे द्वितीत व तृतीय क्रमांक मिळाला तर कनिष्ट गटात युवान दिघे आणि अविनाश झगडे यांना अनुक्रमे द्वितीत व तृतीय क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून सदाशिव कुलकर्णी आणि जय सालियन यांनी काम पाहिले

अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण(Empowerment of Minority) या विषयावर ही पोस्टर स्पर्धा झाली. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात येतील.

———————-

ठाणे येथे २६ जानेवारी पासून कृषी महोत्सव

ठाणे.दि.१९ : ठाण्यात २६ ते ३० जानेवारी  या दरम्यान कृषी महोत्सव घेण्यात येणार असून यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध शेती विषयक बाबींवर माहिती देण्यात येणार आहे.तसेच सर्व प्रकारचे अन्नधान्य ,कडधान्य, भाजीपाला आदी वस्तूचे स्टाॅल लावण्यात येणार आहेत.

 काल जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा ( कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) यांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. महोत्सवाचे ठिकाण निश्चित करण्यात येत आहे.

कातकरीना मिनीकीट मिळावेत

यावेळी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत  परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) २०१७ -१८ या वर्षात आयोजीत कामाचा आढावा घेण्यात आला . जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परसातील भाजीपाला लागवडीसाठी तालुकानिहाय २ हजार मिनी कीट वाटप करण्यात आले या किटमध्ये भेंडी,पालक दोडका चवळी अशी बियाणे  मिनीकीट ४० रुपये अनुदान व 10 रुपये लोकांचा वाटा याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले. तूर पिकाचे उत्पादन व क्षेत्र वाढण्यासाठी विपुला या वाणाचे जिल्ह्यात २५० ग्राम चे मिनिकीट याप्रमाणे १८९० पाकिटांचा पुरवठा महाबीज मार्फत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.  या वेळी  जिल्हाधिकारी यांनी मिनिकीट वाटपात कातकरी समाजाचा समावेश करण्याचे निर्देश दिले.

१६ शेतकरी प्रशिक्षणासाठी

सेंटर फॉर अग्रीकल्चर अॅनड रुलर डेवलपमेंट नवी दिल्ली या संस्थेमार्फत डिसेंबरमध्ये आयसीएआर प्रशिक्षण केंद्र, सिकार, राजस्थान प्रशिक्षणासाठी उल्हासनगरशहापूर,भिवंडी,मुरबाड,कल्याण येथील २२ शेतकरी पाठवण्यात आले.   नैसर्गिक /जैविक शेती ५ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सप्टेंबर २०१६ मध्ये इंदोर येथे आयोजीत करण्यात आला या प्रशिक्षणासाठी ठाणे तसेच पालघर मधील १६ शेतकरी पाठवले.

जिल्ह्यात एकूण ३९३ शेतकरी मित्र आहेत त्यांना आत्मा अंतर्गत शेतकरी मासिक देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाने प्रादेशिक परिषद म्हणून नोंदणी केली आहे जिल्ह्यातील एकूण 10 सेंद्रिय गटांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली असून हे http://pgsindia-ncof.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत .

या बैठकीस उप जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा कृषी अधिकारी श्री सावंत आदि उपस्थित होते

Hits: 7

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email