जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनाई आदेश

ठाणे,दि-२२ पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून महागाई,वीजभारनियमन,पाणीटंचाई व जनतेच्या विविध मागण्यासाठी मोर्चे,आंदोलन,निदर्शने, घेराव,धरणे,सभा इत्यादी कार्यक्रम आयोजन केले जाण्याची शक्यता असल्याने तसेच सध्या रमजान सुरु असल्याने हा मनाई आदेश आहे.या काळात शस्त्रे बाळगणे, जमाव जमविणे यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश 13 मे  दुपारी  12 वाजेपासून  ते 28 मे  रोजी  रात्री 12 वाजेपर्यंत अमंलात राहील. वरील मनाई आदेशाच्या भंग करणाऱ्या विरुध्द करवाई करण्यात येईल असे डॉ.महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email