जिमख्यानात मिळणार दर्जेदार उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण
(श्रीराम कांदु)
डोंबिवली -ऑलिम्पीक दर्जाचे खेळाडू तयार होण्यासठी डोंबिवली जिमखाना सतत प्रयत्नशिल असतो. गेली तीन दशके क्रीडा क्षेत्रात डोंबिवली जिमखाना कार्यरत असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत. यावर्षीही उन्हाळी सुट्टीतही दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उन्हाळी सुट्टी लक्षात घेऊन 1 एप्रिल, 2018 पासून तीन महिन्याचे विविध क्रीडा प्रकारातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पोहणे, , टेनिस, स्केटिंग, क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. तसेच वर्षभरही या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅट मिंटन स्पर्धांसाठी गुरुकुल अकादमीचे प्रशिक्षक नितीन आखाडे मार्गदर्शन करीत आहे
डोंबिवली जिमख्यान्याने गेल्या तीन दशकात सुमारे एक लाख विद्यार्थांना डोंबिवली जिमख्यान्याच्या तरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच डोंबिवली क्रिकेट क्लब आणि डोंबिवली जिमखाना माध्यमातून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या सामन्यातून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या महत्वाच्या खेळाशिवाय बिलियर्डस्, स्नूकर, टेनीस, योगा, कॅरम आदी खेळांचेही मार्गदर्शन डोंबिवली जिमखान्यात दिले जाते. डोंबिवली जिमखाना हा सर्वांसाठी असून जास्तीत जास्त क्रीडा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिमखान्याचे सचिव डॉ. प्रमोद बाहेकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 2451539/2445144 या क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.