जव्हार नगरपरिषद व वाडा नगरपंचायतीवर सेनेची सत्ता 

जव्हार नगरपरिषद व वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता : पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या कन्येचा पराभव

जव्हार नगरपरिषद व वाडा नगरपंचायतीवर सेनेची सत्ता 

पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या कन्येचा पराभव 

वाडा : पालघर जिल्हयातील वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाय. शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या निशा सावरा यांच्या पराभव झालाय. निशा या आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या कन्या आहेत त्यामुळे हा पराभव भाजपला झटका देणारा ठरलाय. वाड्यातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेनेला ६ तर भाजपा ६ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस २, बहुजन विकास आघाडी २ तर राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मतदारांनी नाकारले. जव्हार नगरपरिषदेवर सेनेचा भगवा झेंडा फडकलाय. शिवसेनेचे भिकू पटेल हे नगराध्यक्षपदी विजयी झालेत. शिवसेना १० राष्ट्रवादी ५ भाजप १ प्रगती १ असे पक्षीय बलाबल आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email