जलवाहतूक प्रकल्पासाठी लवकरच बैठक
डोंबिवली दि.११ – कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांचे आभार मानले. तसेच, या प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि ठाणे महापालिका यांची बैठक बोलावून सामंजस्य करार करावा, अशी मागणीही डॉ. शिंदे यांनी केली. त्यावर लवकरच बैठक बोलावण्यात येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
Please follow and like us: