जमीन विकल्याच्या रागातून वृद्ध महिलेवर पतीने केला जीवघेणा हल्ला ; आरोपीला अटक
डोंबिवली – वृद्ध महिलेने आपल्या नावे गावाकडची असलेली जमीन विकल्याने संतापलेल्या तिच्या पतीने धारदार शस्त्राने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याण नजीक असलेल्या आंबिवली अटाळी येथे घडली . रमाबाई आहिरे असे या जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात लक्ष्मण सीताराम आहिरे 60 विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
कल्याण नजीक असलेल्या आंबिवली अटाळी येथे नवनाथ कॉलनी शकुंतला चाळीत रमाबाई आहिरे आपल्या पतीसह लक्ष्मण आहिरे 60 राहत होत्या .आहिरे यांनी जळगाव चाळीसगाव पिंपर खेड येथील आपली जमीन फेब्रुवारी महिन्यात विकली होती .ही बाब लक्ष्मण आहिरे यांना समजताच ते संतापले .त्यांनी काल पहाटे धारदार विळ्याने आहिरे यांच्या गळ्यावर ,हातावर वार करत प्राणघातक हल्ला केला .या प्रकरनि लक्ष्मण यांच्या मुलीने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी लक्षण आहिरे विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
Please follow and like us: