छेडछाडीला कंटाळून जाळून घेतलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू
बीड – शिरूर तालुक्यातील बरडवाडी येथील एका चौदा वर्षीय मुलीने आठ दिवसापूर्वी छेडछाडीला कंटाळून जाळून घेतले होते.गेल्या २३ तारखेपासून ती जिल्हा रूग्णालयात उपचार घेत होती. मात्र उपचार चालू असतांना आज सकाळी ८.३० वाजता तीची प्राणज्योत मालवली.बरडवाडी येथील निकीत अशोक गुरसाळ या चौदा वर्षीय मुलीने गावातील एका तरूणाच्या छेडछाडीला कंटाळून २३ मार्च रोजी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले होते. या मध्ये ती ८० टक्के जळाली होती. जिल्हा रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.उपचार चालू असतांना आज सकाळी ८.३० वाजता या मुलीचा मृत्यू झाला.जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकी येथे याबाबत मुलीचा मृत्यू पुर्व जवाब घेवून त्याबाबतच्या तपासासाठी शिरूर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
Please follow and like us: