छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल-पेण-रोहा या मार्गावर काही दिवसांत काही ई.एम.यू लोकल

मध्य रेल्वे वरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल-पेण-रोहा या स्थानकास जोडण्यासाठी पुढील काही दिवसांत काही ई.एम.यू लोकल गाड्या चालू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे,त्यात पनवेल ते पेण पर्यंत विद्युत् प्रवाह वाहून नेण्यास लागणारे विजेचे खांब टाकन्याचे कार्य वेगवान गतीने सुरु आहे, फक्त रामवाड़ी येथे असणारा 17 क्रमांकाचा महामार्गचा पूल आणि आपटा व निडी चा बोगदा डाउन मार्गावरील किंवा अप मार्गावरील त्यात काही तांत्रिक कामे करण्यास हे काम सध्या धीमी गतीने सुरु आहे,लवकरच हे काम पूर्ण करून 5 डाउन आणि 5 अप अश्या विशेष आणि कायमस्वरूपी साठी गाड्या सुरु करण्यात येतील.​

​या मधे 1)मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रोहा 2)पनवेल-पेण 2 3)पनवेल-रोहा 4)मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पेण या विरूद्ध अप अश्या एकूण 10 लोकल गाड्या असतील​

​पहिली लोकल ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रोहा असेल दूसरी लोकल पनवेल-पेण असेल (ह्या एकूण 2 गाड्या असतील), तीसरी लोकल पनवेल-रोहा असेल आणि चौथी लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पेण अशी असणार आहे​

​अप होताना सकाळी पहिली लोकल पेण येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता रवाना होईल आणि ह्या सर्व गाड्या ई.एम. यु (एलेक्ट्रोनिकम मल्टीपल यूनिट) च्या असतील ह्यामुळे अवघ्या 2 तास 10 मिनिटात मुंबई आणि पेण ह्या स्थानकातील दुरी भरून निघनार आहे मात्र आपल्या नियमित असलेल्या 71089-71096-71095-71092 ह्या गाड्या चे वेळापत्रक पूर्णतः बदलणार आहे.​

Leave a Reply

Your email address will not be published.