चोरीचा प्रयत्न फसला दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार

डोंबिवली दि.२२ – कल्याण पूर्व काटेमानवली येथे लिंक रोड येथील नितीन राज हॉटेल नजीक कृपा शंकर यादव यांच्या मालकीची राम डेअरी आहे तिथेच ते आपल्या कुंटुंबासह राहतात शुक्रवारी रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कृपा शंकर आपल्या घरी झोपले असतांना तीन अज्ञात चोरटे त्यांच्या डेयरीचे शटर उचकटण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान कृपाशंकर यांना जाग आल्याने त्यांनी वडिलांना आवाज देत दुकानाच्या दिशेने धाव घेतली असता तीन अज्ञात चोरटे लोखंडी रोड घेवून त्याच्या डेयरी शेजारील गुप्ता मोबाईल शॉप या दुकानाचे शटर तोडत असल्याचे आढळले त्यांनी तत्काळ त्यांना पकडण्यासाठी पुढे सरसावले यावेळी झालेल्या झटापटीत राजा यादव व अनुराज यादव हे दोन चोरटे त्यांच्या हाती लागले तर त्यांचा कलाम अन्सारी नावाचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. कृपाशंकर यादव यांनी या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी या तीन चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email