चेक वर खोट्या सह्या करत महिलेला सुमारे पावणे चार लाखांचा गंडा

कल्याण – चेकबुक चोरून या चेक वर खोट्या सह्या करत एका इसमाने दोन बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्याच पत्नीला 3 लाख 75 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघड झाला असून या प्ररकरनि महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसानी पतीसह दोन बँक कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पुर्वेकडील पांडुरंग वाडी द्वारविकासविष्णू घैसास येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेच्या पतिने तिचे घरात ठेवलेले चेक बुक चोरले व त्यामधील चेकवर बनावट सह्या करत बँकेतील दोन कर्मचाऱ्या ना हाताशी धरून या महिलेच्या बँक खात्यातून तब्बल 3 लाख 75 हजार 500 रुपये काढून घेतले .सदर बाब निदर्शनास येताच या महिलेने या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी पती पुष्पराज येल्लापूरकर ,शशीकांत येल्लापुरकर ,बँक कर्मचारि कमलेश चित्रे,राजन सरदेशमुख या चार जणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email