चेंदनी कोळीवाड़ा-ऐरोली या मार्गावर ठा. म. पा. परिवहन सेवेची बस सेवा शुरू
( म विजय )
चेंदनी कोळीवाड़ा-ऐरोली या मार्गावर ठा. म. पा. परिवहन सेवेची बस सेवा शुक्रवारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ कळवा नाका येथे करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे कल्याण ज़िल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठा . म . पा परिवहन समिती सभापती अनिल भोर, नगरसेविका प्रियांका पाटील, पुजा करसुले, नगरसेवक उमेश पाटील, गणेश कांबळे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, विभाग प्रमुख विजय शिंदे , विभागप्रमुख अविनाश पाटील , सचिन म्हात्रे, महिला आघाड़ी ज़िल्हा संघटक लता पाटील आदी मान्यवर, शिवसैनिक व महिला आघाडी सदस्य मोठया संखेने उपस्थित होते.
Please follow and like us: