चाळीत रूम चे आमिष दाखवत केली फसवणूक ; राष्ट्रवादीच्या महिला पदाधीकार्यासह तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल

कल्याण – कल्याण नजीक असलेल्या नेवाळी परिसरात राष्ट्रवादी च्या महिला पदाधिकार्याने   रूम चे आमिष दाखवत दोघांना मिळून 2 लाखाना गंडा घातल्याचे समोर आले आहे .या प्रकरणी कोळसेडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे आहे .
             कल्यान नजीक असलेल्या मलंग रोड परिसरात नेवाळी येथे बालाजी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे मनोज धुमाळ आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारि अश्विनी धुमाळ याचे  चाळीचे काम सुरू आहे .त्यांचे कार्यलय पिसवली येथे आहे .दिवा येथे राहणारे मीनल कौशल व देवेंद्र प्रताप सिंह यांनी ऑगस्ट 12 रोजी  प्रत्येकी 1लाख रुपये देवून रूम बुक केला होता .मात्र त्यानंतर तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र रूम चा ताबा दिला नाही तसेच त्यामुळे या दिघाणी धुमाळ यांच्याकडे पैसे परत मागितले असता उडवा उडवी ची उत्तरे दिली .त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी मीनल कौशल यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी बालाजी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे मनोज धुमाळ आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारि अश्विनी धुमाळ या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email