चाकूचा धाक दाखवून लाखोची रोकड लंपास-डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२२ – शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वाईन शॉप बंद करत रोकड घेवून घरी जाणार्या वाईन शॉप च्या मेनेजर ला त्रिकुटाने चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात अज्ञात त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा गोदरेज हिल रिव्हर साईड येथे राहणारे निरंजन मोरडिया साई चौक येथील क्रिश वाईन शॉप येथे मनेजर म्हणून काम करतात काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोरडिया हे वाईन शॉप बंद करून घरच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात होते यावेळी ते गोदरेज हिल परिसरात पोहचले असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले तीन अज्ञात इसम दुचाकीवरून आले त्यांनी मोरदिया यांना हटकले त्यांच्या जवळ असलेली पैशांची बग मागितली असता मोरदिया यांनी विरोध करताच चाकूचा धाक दाखवत या तिघांनी मोरदिया यांना ढकलून देत २ लाख ९९ हजार रुपये रोकड असलेली पिशवी हिसकावून घेत तेथूनधूम ठोकली. या प्रकरणी मोरदिया यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी या त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.