चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत. पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एक फिजिशीयन डॉक्टर नाही.साथीचे रोग किंवा गंभीर आजारासाठी रुग्णाना मुंबईला पाठवले जाते. शास्त्रीनगर रुग्णालयाची अवस्थाही याच प्रकारची आहे.करोडची औषध खरेदी करण्यात येते पण महापालिकेच्या हॉस्पिटल मध्ये औषधें उपलब्ध नसतात. कुत्रे चावल्यास किंवा साप चावल्यास पालिका रुग्णालयात त्यावर इंजेक्शन उपलब्ध नसतात.पालिकेच्या या रुग्नालायांची अवस्था सुधारावी अशी मागणी आता शहरात होवू लागली आहे.एकीकडे गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही.तर दुसरीकडे पालिका रुग्णालयात पुरेशा सेवा उपलब्ध नाहित.खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत व त्यांनी शहरवासियांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी नक्की प्रयत्न करतील अशी अपेक्षा शहरात व्यक्त होत आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून नुकतचं महाआरोग्य शिबिराचे आयोजन आयोजन नांदिवलीच्या आर्य गुरुकुल शाळेत करण्यात आले होते. यात दहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच एक करोड रुपयांची औषधे वाटण्यात आली.सदर महाआरोग्य शिबिर त्यातील विविध आजारांच्या तपासण्या, चाचण्या, औषधोपचार, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला या सेवा या शिबिरात देण्यात आल्या.कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत तसेच शहरवासियांना  वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी राबवलेले शिबीर पाहता येथील नागारिकात समाधान व्यक्त होत असून खासदार डॉ श्रीकांत शिंदे येथील महापालिकेच्या रुग्णालयातील परिस्थितीत सुधारणा करतील असा विश्वास आता निर्माण झाला आहे.वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महाआरोग्य शिबिरासारखे त्यांचे प्रयत्न पहाता शहरवासियांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न पुन्हा एकदा जोर धरु लागले आहे. महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाला जिल्हा शासकीय रुग्णलयाचा दर्जा मिळावा म्हणून शिवसेना पत्र व्यवहार करीत आहे.पालक मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतल्यास हे शासकीय जिल्हा रुग्णालय बनणे शक्य असून त्यातून अनेक रुग्णाना आता पालिका रुग्णालयात मिळत असलेल्या सेवेपेक्षा अधिक चांगली सेवा मिळु शकते.जिल्हा शासकीय रुग्णालयाची प्रतीक्षा येथील नागरिक करीत असून शहरातील हॉस्पिटल गरीब रुग्णाना परवडत नाहीत. महापालिका निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे आश्वासन दिले होते.परंतु अद्याप असं रुग्णालय शहरवासियांसाठी उपलब्ध झालेले नाही.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न महापालिका निवडणुकीत शिवसेनेने दाखवले पण निदान येथे जिल्हा शासकीय रुग्णालय तरी शिवसेनेने उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा येथे व्यक्त होत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email