घोड्यांच्या रेस मधून जमा होणा-या कराची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी काम करणा-या संस्थाना द्या

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची विधानसभेत सूचना

मुंबई – समाजसेवी संस्थाना मदत करता यावी म्हणून मुंबईतील रेसकोर्सवर १५ विशेष रेस घेतल्या जातात त्यातून जमा होणारा कर समाजसेवी संस्थाना मदत म्हणून देण्याची तरतूद आहे. ही मदत यापुढे आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी काम कारणा-या संस्थाना द्या अशी सूचना विधानसभेत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.

विधानसभेत गृह, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन या विभागावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात एस व्ही रोड वरील लकी हॉटेल समोरील भूखंडावर सायबर क्राईम डिटेक्शन सेंटर प्रस्तावित आहे. या सेंटरला सरकारने मान्यता दिली असून राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ला बैठक घेण्यास परवानगी नाकारल्यामुळे या सायबर सेन्टरच्या परवानग्या रखडल्या आहेत. याची गरज लक्षात घेता सरकार ने आवश्यकता भासल्यास न्यायालयात जावे  अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली.

सांताक्रूझ येथे ४७ पोलिसांची घरे असणारी इमारत १५ जून २०१७ ला बांधून पूर्ण झाली. पोलीस कर्मचारी या वसाहतीत राहण्यास गेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेचे नाव प्रॉपर्टी कार्डवर न लावल्यामुळे या वसाहतीला दुप्पट दराने पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कर्मचाऱ्याना न्याय द्यावे. तसेच वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात जून २०१४ ते ऑगस्ट २०१४ या तीन महिन्यात एकाच भागात २१ हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली. त्यापैकी २०० कार्ड बोगस असल्याचे दिसून आले. त्यामध्ये बांग्लादेशींचा देखील समावेश होता. त्यामुळे ही मतदार नोंदणी संशयाच्या भोव-यात असून याची चौकशी करावी अशी मागणी आज पुन्हा एकदा त्यांनी केली.

वांद्रे येथील पोलीस वसाहतीतील पेवर ब्लॉक बसवणे, मलनिसारण व जलनिसारण वाहिन्या तसेच पायवाटा व सुशोभिकरणासाठी २ कोटी ९ लाख ६८ हजार रुपयांचा निधी २०१६ ला मंजूर झाला. पण अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे त्वरित सुरवात करण्यात यावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. त्याचवेळी अंधेरी ते बांद्रा दरम्यानच्या पश्चिम द्रुतगती मार्गाचे विमानतळाच्या रोड प्रमाणे सुशोभीकरण करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी केली होती त्याचे स्मरण करून देत त्याची कामे सुरु करावी अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

Please follow and like us:
Pin Share

Hits: 13

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email