घरात घुसून तीन जणांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार ;दोघांना अटक एक फरार
भिवंडी –घरात घुसून पालकांना घराबाहेर काढून जिवे ठार मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तीन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील न्यू आझादनगर परिसरात नुकतीच घडली आहे. पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार झालाय.
अमानुष अत्याचार प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघा नराधमांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंमु उर्फ इम्रान खान (वय-२४वर्षे), जावेद शेख (वय-२३वर्षे) व किन्ना असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.बुधवारी तिघे नराधम संगनमत करून पीडितेच्या घरात शिरले तिच्या आईवडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देत त्यांना घराबाहेर काढले. तिघांनी पीडित तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर तिघेही नराधम फरार झाले. परन्तु पोलिसांनी सापळा रचून इम्रान आणि जावेद या दोघांना शिताफीने अटक केली. तर यातील तीसरा आरोपी किन्ना हा फरार आहे. या दोघांना गुरुवारी ठाण्याच्या जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.