घराचे कुलुप फोडून सोन्याचा ऐवज लंपास
(श्रीराम कांदु)
डोंबिवली-घराचे कुलुप फोडून सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना नुकतीच कोळेगाव येथे घडली.याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोळेगाव येथील शानिकृपा कॉम्प्लेक्स येथील एका घराचे कुलुप तोडून चोराटयांनी घरातील सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.या दागिन्यांची किंमत सुमारे ७३ ह्जार ५०० रुपये आहे.गुरुवारी दुपारी ३ ते ६ च्या दरम्यान सदर घटना घडली.याप्रकरणी मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: