घराचे आमिष दाखवून लाखोंना गंडा,त्रिकुटावर गुन्हे दाखल,व अन्य कल्याण गुन्हे वृत्त.

(श्रीराम कांदु )
कल्याण : स्वस्त दरात घर देतो असे आमिष दाखवत त्रिकूटने एका महिलेला तब्बल 34 लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी सदर पीडित महिलेनेदिलेल्या तक्रारी नुसार खडकपाडा पोलिस स्थानकात तीन जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन शिंदे,संतोष शिंदे,पूनम शिंदे असे या तिघांची नावे आहेत.
      सदर पीडित महिला ही कल्याण पश्चिमेकडील न्यू गुरुकृपा अपार्टमेंट मध्ये राहते .ओक्तोबत २०१० मध्ये सचिन शिंदे याने या महिलेला मी एका मोठया बांधकाम व्यवसायिकाला रेती पुरवण्याचे काम करतो त्याच्या इमारती मध्ये चार फ्लॅट मिळणार आहेत .त्यामधील एक फ्लॅट तुम्हालाकमी किमतीत देतो असे आमिष दाखवले .या।आमिषाला भुलून या महिलेने त्यांना २३ लाख १० हजार रुपये रोख व १० लाख ४० हजार रुपये असे एकूण ३४ लाख रुपये देवू केले .मात्र सात वर्षाचा कालावधी उलटूनही त्याने तिला घराचा ताबा दिला नसल्याने तीने घरासाठी तगादा लावला त्यामुळे संतोष शिंदे याने घरचे अग्रीमेंत करून चावी देतो असे सांगत तिच्याकडून ५० हजार रुपये घेतले यावेळी पूनम शिंदे हि ने देखील या महिलेला आश्वासन दिले मात्र त्यानंतर महिना भाराचा कालावधी लोटूनही घराचा ताबा न मिळाल्याने या महिलेला आपली फसवणूक झालायचे लक्षात आल्याने तिने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात सचिन शिंदे,संतोष शिंदे,पूनम शिंदे या तिघा विरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु  केला आहे
बार बंद झाल्याचे बार कर्मचार्याला मारहाण
कल्याण : कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात बार बंद झाल्याचे सांगितल्याने एका बार मध्ये काम करणाऱ्या कर्मचार्याला दुकलीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे .अमर नायक असे या कर्मचार्याचे नाव असून तो चिंचपाडा परिसारत असलेल्या कल्पना बार मध्ये काम करतो रविवारी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारस बार बंद करून नायक बार मधील किचन सफाई चे काम कार्थोते यावेळी सुजा आमकर व मेहमूद नावाचे दोन तरुण त्या ठिकाणी आले यावेळी नायक यांनी बार बंद झाल्याचे सांगितले त्यामुळे संतापलेल्या दोघांनी नायक यांना बाहेर येण्यास सांगत बार मध्ये घुसून रोकड लंपास केली व बारच्या काचा फोडून नुकसान केले .या प्रकरणी नायक यांनी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मेहमूद आणि सुजा आम्कर या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
नोकरीचे आमिष दाखवून साडे तीन लाखांना गंडा
कल्याण : कल्याणात नोकरीचे आमिष दाखवत एका भामट्याने एका बेरोजगार तरुणाला तब्बल साडे तीन लाखांना गंडा घातल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे .जळगाव येथे राहणारे राजू पाटील यांना कल्याण पूर्वेकडील तिसगाव येथे राहणर्या पुतण्या प्रमोद पाटील याला जितेंद्र पाटील नावाच्या इसमाने नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवले या आमिषाला बळी पडत तब्बल साडे तीन लाख पाटील यांना देवू केले मात्र दोन वर्ष उलटूनही नोकरी बाबत काहीच हालचाल न दिसल्याने त्यांना आपली फसवणूक झालायचे लक्षात आले या प्रकरणी राजू पाटील यांनी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इस्माविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
मोबाईल वर मेसेज पाहने पडले महागात
धूम स्टाईल ने मोबाईल केला लंपास
कल्याण : कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी परिसारत राहणारे विजयेंद्र सिंह हे काळ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारस विठ्ठल वाडी स्टेशन बाहेरील रस्त्यावर आपल्या मोबाईल वर मेसेजटाईप करत होते यावेळी अचानक पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील मोबाईल खेचून धूम ठोकली .या प्रकरणी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
उघड्या दरवाजावाटे घरात घुसून १ लाख ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल
कल्याण : कल्याण पूर्वेकडील गौरीपाडा परिसरात श्री गणेश कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे राजशेखर राठोड सकाळी सवा नवू वाजण्याच्या सुमारास घरात झोपले होते यावेळी घराचा दरवाजा उघडा होता अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे घरात घुसून त्यांचा मोबाईल ,८१ हजार रोख ,पाकीटा मधील २३ हजार रोख ,अस मिळून तब्बल १ लाख ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला दहा वाजण्याच्या सुमारास राठोड यांची बहिण घरी आली तिने चोरी झालायची बाबा त्याच्या निदर्शनास आणून दिली असतान राठोड यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कल्याण : कल्याण पश्चिम बैल बाजार परिसरात राहणारी सदर पिडीत मुलगी काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना वासिम खान नावाच्या तरुणाने तिच्या कडे अश्लील हावभाव केले .या आधी हि वासिम तिचा नेहमीच पाठलाग करत असल्याने या तरुणीने या पप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी वासिम खान विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे .
जनरेटर व्हन च्या बटरी सह कॉपर वायर लंपास
आठवडा  भरातील दुसरी घटना
कल्याण : काही दिवसांपूर्वी कल्याण शील रोड टाटा पावर नजीक असलेल्या पेट्रोल पंप शेजारी उभ्या असलेल्या जनरेटर व्हन च्या कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याच्या घटना घडली होती या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी पुन्हा एकदा काल पहाटे कल्याण शील रोड वरील मदिना खान चाळी समोर उभ्या राहणाऱ्या जनरेटर व्हन च्या बटरी व कॉपर वायर असा एकूण १२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी जनरेटर व्हन चे मालक अब्दुल्ला खान यांनी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असू या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .तर दुसरी घटना कल्याण शील रोड सोनार पाडा परिसरात घडली आहे .शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनारपाडा परिसरात राहनारे प्रदीप साळुंके यांच्या मालकीच्या ९ जनरेटर व्हन सोनारपाडा परिसरात उभ्या होत्या शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्याच्या व्हन मधील बटरी ,कॉपर वायर असा मिळून ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी साळुंके यांनी काल सायंकाळी उशिराने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
दिवाळीत चोरट्यांची दिवाळी
बाजारातील गर्दीचा फायदा घेत लुटमार सुरु
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक ते मोहम्मद अली रोड दरम्यान दिवाळीच्या खरेदी साठी नागरिकांची एकच गर्दी होते .हि गर्दी चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे या नागरिक खरेदी मध्ये व्यस्त असल्याची संधी साधत अज्ञात चोरते त्याच्या जवळील मुद्देमाल लंपास करत आहेत .खडकपाडा परिसरात वायले नगर मध्ये राह्नारी महिला काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या परिसरात खरेदीसाठी आली होती ती खरेदी मध्ये व्यस्त असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने या महिलेची पर्स ब्लेड च्या सहाय्याने कापून पर्स मधील मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी सदर महिलेने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email