घराचे आमिष दाखवून महिलेला १ लाखाना गंडा
डोंबिवली दि.२२ – चाळीमध्ये स्वस्त घर देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला दोन कथित बिल्डरांनी एक लाखाला गंडवल्याची घटना समोर आली आहे .या प्रकरणी महिलेने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून तक्रारी नुसार पोलिसानी प्रेमचंद पांडे व धनराज जावळे या दोन कथित बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमचंद पांडे व धनराज जावळे या दोन कथित बिल्डरांनी कल्याण पश्चिम येथे मुरबाड रोड वर साई स्वराज बिल्डर आणि डेव्हलपर्स नावाने कार्यलय थाटल आहे .टिटवाळा येथील म्हसकल परिसरात आमचे चाळींचे बांधकाम सुरू असल्याचे सांगत होते .टिटवाळा मांडा वासुंदरी रोड येथे राहणाऱ्या महिला दुर्गा कामाठी यांना २०१३ मध्ये या दोघांनी म्हसकल येथे रूम घेऊन देण्याचे आमिष दाखवत दीड लाख रुपये घेतले होते . तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र घर न मिळाल्याने कामाठी याना आपली फसवणूक झाल्याचे कळले त्यांनी पैसे परत मागितले असता या दोघांनी त्यांना ५० हजार रुपये देऊ केले मात्र उर्वरित १ लाख रुपये देण्याबाबत त्यांनी टाळाटाळ केली .अखेर त्रस्त महिलेने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी प्रेमचंद पांडे व धनराज जावळे या दोन कथित बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.