घरमालकांना लिव्ह अॅण्ड लायसन्स दस्त नोंदणी बंधनकारक
ठाणे – घरमालकांना लिव्ह अॅण्ड लायसन्सचे दस्त नोंदणीकृत करणे लाभाचे असून सर्वांनी या लायसन्सचे करारनामे त्यांचे कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करावेत .
महाराष्ट्र शासनाने लिव्ह अॅण्ड लायसन्स करारनाम्याची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी / अधिकृत सेवा प्रदाता (Authorised Service Provider) यांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून असे दस्त नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याची माहिती प्रत्येक मुंद्राक कार्यालयात आहे.
लिव्ह अॅण्ड लायसन्स दस्तांची नोंदणी करणे मालकावर बंधन कारक आहे . या करारामध्ये त्या भाडेकरूचे नाव , आधार कार्ड, पत्ता यासारखी माहिती सर्व माहिती अधिकृतपणे नोंद केली जाते. हा करारनामा काही प्रसंग उभा राहिल्यास कायदेशीर नोंद म्हणून उपयोगी येतो. लिव्ह अॅण्ड लायसन्स करारनामा नोंदवण्याची जबाबदारी मालकाची आहे त्याचे अनुपालन न केल्यास कलम ५५ (३)नुसार ३ महिने कारावास अथवा जास्तीत जास्त ५ हजार किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. असे आवाहन एस. ओ. नारखेडे सह जिल्हा निबंधक वर्ग २ ठाणे ग्रामीण यांनी केले आहे .