घरगुती शिकवण्या घेणार्‍यांना जीएसटी म्हणजे बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली सुपारीच ; आ. जितेंद्र आव्हाड

ठाणे- घरगुती शिकवण्या घेणार्‍यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी तयार केला आहे. हा प्रकार म्हणजे बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली सुपारीच आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पालकांनी मुलांना मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये टाकण्यासाठी सरकारचा हा सगळा आटापिटा असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे.
आ. जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात सोशल मिडीयावर विशेष प्रतिक्रीया नोंदवली आहे. त्यांनी आपल्या लेखामध्ये म्हटले आहे की,  समाजात पुन्हा विषमता आणायची आणि वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची यासाठी भाजपा सरकार प्रत्येक प्रयत्न आहे. घरातल्या घरात शिकवण्या घेणार्‍यांना सरकारकडे नोंदणी आवश्यक करणं, त्यांना 5% अधिभार, आयकर, जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावाचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार केला आहे. विषमता आणि वर्णव्यवस्था आणायचा तो एक बिलंदर प्रयत्न आहे हे मी विनोदाने नाही तर अतिशय गंभीरपणे सांगतो. शालेय मुलांच्या घरबसल्या शिकवण्या घेणार्‍यांमध्ये बहुसंख्य महिला आहेत. आपल्या शिक्षणाला साजेशी किंवा घराच्या जवळपास नोकरी मिळत नाही, अथवा बाळंतपणानंतर आपल्या मुलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडलेल्या महिला यात प्रामुख्याने आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित आहेत. घरातच काम करुन संसाराला चार पैशांचा हातभार लागावा हा या महिलांचा हेतू असतो. निवृत्तीनंतर आयुष्यात अचानक रितेपणा येतो. किंवा पेन्शनमधे भागत नाही म्हणूनही अनेक स्त्रिया हा व्यवसाय करतात. शारीरिक अपंगत्वामुळे कधीच नोकरी न करु शकलेली, अविवाहित आणि आता वार्धक्याकडे झुकलेली एक महिला तर थेट आपल्या माहितीत आहे. कोण असतात त्यांचे विद्यार्थी? एखाद्या विषयात कच्ची असलेली, शाळेतल्या सुमार दर्जाच्या शिक्षणामुळे पालकांची चिंता बनलेली, कनिष्ठ किंवा मध्यमवर्गीय घरातली मुलं; ज्यांना महागड्या कोचिंग क्लासेसची फी परवडत नाही. चारदोन मुलांच्या शिकवण्या घेणार्‍या या महिलांचं उत्पन्न लाखो रुपयांत नसतं. किंबहुना, हे एक ज्ञानदानाचं काम आहे. कराची कुर्‍हाड आता त्यांच्यावरही घालायला सरकार निघालं आहे असेही आ. आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email